भुसावळ प्रतिनिधी । बिहारमधील नातेवाईकांना भेटून पुन्हा सांगली येथील साखरकान्यावर नोकरीवर जात असलेल्या तरुणाचा रेल्वे प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी भुसावळ स्थानकावर घडली.
मुन्ना हाफिस अन्सारी (३८) रा. तरला. पो. बेलवडी (बिहार) असे मयताचे नाव आहे. सांगली जिल्हयातील वारेगाव येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यामध्ये मुन्ना अन्सारी हे कार्यरत होते. कामावर सुटी घेवून ते काही दिवसापूर्वी गावी आले होते. ते काशी एक्सप्रेसने सांगली येथे येण्यास निघाले होते. भुसावळ स्थानकावर गाडी असता त्यांच्या छातील कळा आल्या. सोबतच्या सहकारी साजीद अन्सारी तसेच जगदीश कुशवाह यांच्या प्रकार लक्षात आल्यानंतर दोघांनी गाडी थांबल्यावर त्यांना स्थानकावर उतरविले. सजग लोहमार्ग पोलिसांनी रग्णवाहिकेतून जळगावत येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वाटेतच मुन्ना अन्सारी यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.पोलीस कॉन्सटेबल प्रकाश डोंगरदीवे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुन्ना अन्सारी हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी शहनाज,मुलगा, मुलगी , आई, वडील असा परिवार आहे.