अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप कॉलेजमधील वाणिज्य शाखेतील जेष्ठ प्राध्यापक व्ही. व्ही. सोनवणे यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते 54 वर्षाचे होते.
प्राध्यापक व्ही. व्ही. सोनवणे यांची अभ्यासू प्राध्यापक म्हणुन ख्याती होती. त्यांनी एमफिलची पदवी ही जवाहरलाल नेहरु विद्यापीठ,दिल्ली येथुन प्राप्त केली होती. त्यांनी कैप संचालक(परीक्षा विभाग),उप-प्राचार्य म्हणुन देखिल उत्तमरितिने जवाबदारी पार पाडली होती. ते एन.मुक्टो संघटनेचे सल्लागार होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ,बहिन,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.