Home Uncategorized रेल्वेचा धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

रेल्वेचा धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू


sucide

भुसावळ (प्रतिनिधी) येथील न्यू सातारा ओंकारेश्वर मंदिर भागातील रेल्वे कर्मचाऱ्याला रेल्वेचा अचानक लागलेल्या धक्क्यामुळे दुखापत होत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडलीय.

 

रेल्वेमध्ये नोकरी करीत असलेले राजेश भीमराव मायकल (वय ४९, रा. न्यू सातारा,ओंकारेश्वर मंदिर) हे दिनांक ४ मे रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ड्युटीवर १.५ किलोमीटर उत्तरेस रेल्वे लाईन वरून जात असतांना अचानक गीतांजली एक्स्प्रेस आली. सावरण्याआधीच मायकल यांना एक्स्प्रेसचा जोरदार धक्का लागला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. रेल्वे दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत मुख्य चिकित्सा अधिकारी मध्य रेल्वे भुसावळ यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी नुसार अकस्मात मृत्यू १४/२०१९ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास तपास पोहेकॉ.मोहम्मद अली सत्तार अली सैय्यद करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound