दारूच्या नशेत विष घेतलेल्या केवडीपूरा येथील प्रौढाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । दारूच्या नशेत विषारी औषध घेतलेल्या केवडीपूरा येथील ४८ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ५ जुलै रोजी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकनाथ त्र्यंबक भील (वय-४८ रा. केवडीपूरा ता. एरंडोल) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एकनाथ भील हे आपले वडील आणि मुलासोबत एरंडोल तालुक्यातील केवडीपूरा येथे वास्तव्याला होते. मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावाजवळी अंजनी धरणाजवळ त्यांनी दारूच्या नशेत असतांना विषारी औषध सेवन केले. हा प्रकार गावातील नागरीकांना समजल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांना तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. वैद्यकीय अधिकारी निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात वडील त्र्यंबक भील आणि मुलगा गणेश असा परिवार आहे.

Protected Content