जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसीतील कृष्णा कंपनीत काम करणाऱ्या २४ वर्षीय तरूणाने कंपनीतील खोलीत विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकासचंद्र मुकुंदा प्रधानन वय २४ रा.कृष्णा कंपनी, एमआयडीसी, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव एमआयडीसीतील कृष्ण कंपनीत विकासचंद्र प्रधानन हा तरूण गेल्या काही महिन्यांपासून कामाला होता आणि तिथेच राहत होता. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्याने कंपनीत असतांना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याचा प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी १ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता प्राणज्योत मालविली. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.