जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशीनाथ लॉज समोर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामेश्वर कॉलनीतील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय रोहिदास बेंद्रे वय ३० रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे संजय बेंद्रे हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता संजय बेंद्रे हा शहरातील काशीनाथ लॉज जवळ उभा असतांना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात संजय हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.