रेल्वेचा धक्क्याने 30 वर्षीय महिलेचा मृत्यू

sucide

 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली गावापासून काही अंतरावर रेल्वेचा धक्क्या लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. दरम्यान, मयत महिला ट्रॅकवर पडलेले भंगार गोळा करण्यासाठी गेली असतांना हा अपघात घडला. याबाबत रेल्वे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, रेखा देविदास सोनवणे (वय 30, रा. नांद्रा ता.पाचोरा) या गेल्या महिन्याभरापासून आजारी असल्याने भाऊ अशोक भगवान पवार (रा. शिरसोली ता.जळगाव) यांच्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेखा सोनवणे या रेल्वे पटरी पडलेल्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व इतर भंगार जमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक रेल्वेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन प्रबंधक शिरसोली यांच्या खबरीवरून रेल्वे पोलिसात घटनेची माहिती देऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content