Home क्राईम जळके येथील विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळके येथील विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


suside
 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जळके येथील 27 वर्षीय तरुणाने शेतात पीक फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी केला होता. आज दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील गफूर राजमल तडवी (वय 27) यांनी जळके शनिवारी 11 मे रोजी दुपारी रस्त्यावर पिकांवर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने आज दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound