हिंगोणा येथे बेकायदेशीर गोठा मंजुरीच्या चौकशीसाठी आमरण उपोषण सुरु

hingona uposhan

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथे आपल्या नातेवाईकाने कुठलीही परवानगी न घेता माझ्या जागेवर शासनाच्या वतीने गाय गोठा मंजुर करून अनुदान मिळवले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी याकरिता सोनु गणु भालेराव यांनी येथील पंचायत समितीसमोर आजपासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, हिंगोणा येथील रहिवासी असलेले सोनु गणु भालेराव (वय ७४) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १३/०५/२०१९ रोजी लोकशाही दिनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रणजीत रमेश भालेराव यांनी माझे जागेवर माझी कोणतीही परवानगी न घेता शासनाच्या योजनेद्वारे अनुदान मिळवुन बेकायद्याशीर गोठा बांधला आहे. या गोठ्याला मंजुर करुन घेवुन शासनाची फसवणुक केली आहे.

पंचायत समितीमध्ये या संदर्भातील चौकशी व्हावी म्हणुन आपण उपोषणाला बसणार असल्याचे प्रशासनाला अवगत केले असतांना आपण उपोषणाला बसु नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने चौकशी व कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सहा महीने उलटुनसुद्धा अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या गोठा प्रकरणात कोणतीही चौकशी होवुन कार्ववाही न झाल्याने सोनु गणु भालेराव या जेष्ठ नागरिकाने येथील पंचायत समीतीसमोर आजपासुन आमरण उपोषण सुरू केले आहे .

या संदर्भात उपोषणकर्ते सोनु भालेराव यांचे नातेवाईक रणजीत भालेराव यांनी सर्व आरोप फेटाळुन लावलेले असुन म्हटले आहे की, हिंगोणा येथील ग्रामपंचायत घर क्रमांक १२४१ हे शांताबाई गेंदु भालेराव यांच्या मालकीचे आहे व आज रोजी ग्रामपंचायत नमुना नंबर ८ वर सुद्धा शांताबाई गेंदु भालेराव यांचे नांव आहे व सोनु भालेराव याचे नाव यात नाही. तर त्यांची सम्मती घेण्याचा प्रश्नच उरत नाही. काळू सोमा भालेराव व मुराबाई हरी तायडे यांची सध्या या जागेवर मालकी आहे व सावदा येथील दुय्यम निबंधक सावदा ता. रावेर यांच्याकडुन पन्नास वर्षापुर्वी १९७८ या वर्षी रितसर खरेदी केलेली आहे. येथील भूमी अभिलेख यांच्या चुकीच्या शेऱ्यामुळे सोनू भालेराव व गेंदु अण्णा भालेराव यांचे नाव लागले आहे, ते नाव कमी करण्यासाठी आम्ही येथील न्यायालयामध्ये या सदर्भात दावा दाखल करून दाद मागीतली आहे.

संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामपंचायत नमुना नंबर आठ नुसार मंजूर केली जाते व मी रणजीत रमेश भालेराव माझी आजी शांताबाई नंदू भालेराव यांची संमती घेऊनच त्याच जागेवर गोठा केलेला आहे. या संपूर्ण कामाची चौकशी ग्रामविकास अधिकारी व ग्राम रोजगार सेवक यांनी पाहणी करून मला गोठयाचे धनादेश दिलेले आहेत. या गाय गोठा संदर्भात मी गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी यांना आपला सविस्तर खुलासा सादर केलेला आहे. पुढील जागेची तक्रार ही न्यायप्रविष्ट असून न्यायालयाकडुन जो निर्णय येईल, तो मला मान्य राहील. मला मानसिक त्रास देण्याच्या हेतुने सोनू भालेराव हे हा सर्व प्रकार करीत असल्याचेही रणजीत भालेराव यांनी म्हटले आहे.

Protected Content