फैजपुर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पिंपरूळ येथील एका विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
या संदर्भात अधिक असे की, मंदाबाई छगन तायडे (वय २८) या आज सकाळी आपल्या घरासमोर भांडी धूत होत्या. यावेळी अचानक त्यांना सर्पदंश झाला. या घटनेची माहिती मिळताच घरातील सदस्यांनी व आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपुर पोलीस स्टेशनला पोलीस पाटील हरिष चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि प्रकाश वानखेडे फौजदार जिजाबराव पाटील सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ हे करीत आहे. मंदाबाई तायडे यांच्या पश्चात पती तीन मुले असा परिवार आहे.