अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळला मृत वाळा साप

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात माता बालक पोषण आहार योजना राबली जाते. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागा अंतर्गत ही योजन राबवली जाते. या माध्यमातून गर्भवती माता आणि लहान मुलांना सकस आहाराचे वाटप केले जाते. आता या आहारातच चक्क मेलेला साप आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगलीच्या पळूसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना आहार वाटप करण्यात आला होता. सांगलीच्या पलूस येथील अंगणवाडीमधून हे वाटप करण्यात आले. त्यावेळी जो पोषण आहारात वाटला जात होता त्यात मेलेला साप आढळला. हा साप वाळा साप होता. डाळ,तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणाऱ्या पॅकेटमध्ये हा वाळा साप आढळून आला आहे.

गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना सरकारच्यावतीने हा पोषण आहार देण्यात येतो. या आहारात जेव्हा हा साप आढळला तेव्हा तिथे असलेल्या आंगणवाडी सेविका हबकल्या. त्यांनी तातडीने या आहराचे वाटप करण्याचे थांबवले. संपुर्ण राज्यात एकाच ठेकेदाराकडून या पोषण आहाराचे वाटप केले जाते. दरम्यान हा सापा त्या पॅकेटमध्ये कसा आला याची चौकशीची मागणी होत आहे.

Protected Content