१३ जानेवारी रोजी डीडीसीए अध्यक्षपदाची निवड

Delhi and District Cricket Association team

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (डीडीसीए) येत्या १३ जानेवारी रोजी नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. पत्रकार रजत शर्मा यांनी डीडीसीएचे अध्यक्षपद सोडल्यानंतर हे पद रिक्त आहे.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) पदाधिकाऱ्यांनी केलेल्या राड्यामुळे चर्चेत आली आहे. रविवारी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी बैठकीला बॉक्सिंग रिंगचे स्वरुप आणले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून दिल्ली असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षपद भाजपचे खासदार गौतम गंभीरने स्विकारावे, अशी विनंती केली आहे. अध्यक्षपदासाठी रणनिती निश्चित झाली असून सर्व नियोजनानुसार झाल्यास माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर हा डीडीसीएचा नवा अध्यक्ष असेल. गंभीरच ही जबाबदारी पार पाडू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधारासोबत चर्चा झाली आहे.

Protected Content