आता म्हणे दाऊद आमच्या देशात नाहीच ! : पाकची कोलांट उडी

इस्लामाबाद । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा अपल्या देशात असल्याची स्वीकृती दिल्यानंतर पाक सरकारने एका दिवसात कोलांट उडी मारून तो आमच्याकडे नसल्याचे जाहीर केले आहे.

फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाकिस्ताननं ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची यादी जाहीर केली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्या यादीत दाऊद इब्राहिमच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्ताननं पहिल्यांदाच दाऊद त्यांच्या भूमीवर वास्तव्यास असल्याची कबुली दिली. इम्रान खान सरकारनं प्रसिद्ध केलेल्या यादीत दाऊदच्या नावापुढे व्हाऊस हाऊस, कराची असा पत्ता देण्यात आलेला आहे.

दरम्यान, आता पाकिस्ताननं कोलांटउडी घेतली आहे. अवघ्या २४ तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात मपाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत, अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यात अजिबात तथ्य नाही. काही कुख्यात व्यक्तींचं (दाऊद इब्राहिम) वास्तव्य देशात असल्याची कबुली पाकिस्ताननं दिल्याचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं आहे. या वृत्ताला कोणताही आधार नसलयाचे स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलं आहे.

Protected Content