दापोरा येथील शेतमजूराची गळफास घेवून आत्महत्या

Dapora
Dapora

Dapora

जळगाव प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या दापोरा येथील प्रौढ शेतकऱ्याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर सुकलाल साठे (58) रा. दापोरा ता.जि.जळगाव हे शेतमजूरीचे काम करतात. ते सतत आजारी राहत हाते. शौचाला जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता गिरणा नदीच्या काठाला असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्या मृत्यूने परीसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पाटील जितेश गवंदे यांच्या खबरीवरून ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गळफास घेतल्याची माहिती मिळताच नातेवाईकांना घटनास्थळी हंबरडा फोडला. ग्रामीण पोलीसांनी पंचनामा केला. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत मुरलीधर साठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. याबाबत ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here