Home Cities जामनेर संगमेश्वर मंदिराजवळील कललेला वीजखांब धोकादायक

संगमेश्वर मंदिराजवळील कललेला वीजखांब धोकादायक

0
41

पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराजवळील कललेले विजेचे खांब बाजूने वळविण्याची मागणी   ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केली आहे.

श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे पहूर पंचक्रोशीतील भाविकांचे जागृत देवस्थान आहे.येथे दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरा जवळूनच उच्च दाब क्षमतेची वीज वाहिनी गेलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सदर विजेचे खांब कललेले आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सदर वीज वाहिनी मंदिराच्या बाजूने वळविण्यात यावी अशी मागणी श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी वीज अभियंत्यांकडे केली आहे.


Protected Content

Play sound