धोका वाढला : जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन ३९ रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढत होतांना दिसून येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण ३९ रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात १७, भुसावळ तालुका-९, अमळनेर-१, चोपडा-३, एरंडोल-४, चाळीसगाव-५ असे एकुण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आता ९१ बाधित रूग्ण संख्या झाली असून विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आता कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने नागरीकांनी कोरोनाची लक्षणे जाणवताच तातडीने तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

 

Protected Content