जळगाव प्रतिनिधी । शहरातील दांडेकर नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून दुचाकीसह लॅपटॉप चोरीला गेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा राहणाऱ्या पुनमचंद सुपडु पाटील (वय-57) रा. दांडेकर नगर यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील लॅपटॉप आणि दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. ५ जुलै ते ७ जुलै दरम्यान ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून मध्यरात्री फोडून घरातील १५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेला. हा प्रकार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी पुनमचंद पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल रत्ना मराठे करीत
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
आहे.