अमळनेर शहरात दामिनी पथक कार्यरत

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातील विद्यार्थीनींची छेडखानी करणाऱ्यांवर आणि टवाळखोरांवर आळा घालण्यासाठी कॉलेज व वर्दळीच्या ठिकाणी अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दामिनी पथक कार्यरत करण्यात आले आहे.

 

अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अमळनेर शहरातील किशोरवयीन विद्यार्थींनी ह्या शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसला जात असतांना बऱ्याच वेळा काही टवाळखोर तरूणांकडून छेडखानीचे प्रकार होत असतांना. त्यांचा पाठलाग केला जातो, त्यांना ब्लॅकमेलींग केले जाते. या आळा घालण्यासाठी व महिलांसह शाळकरी मुलीचे छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर आणि वर्दळीच्या ठिकाणी सतत गस्त करण्याकरीत  पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये महिला पोलीस हवलदार रेखा भरत ईशी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबर नम्रता जरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महिलांचे छेडखानीचे प्रकार, पाठलाग करण्याचे प्रकार, टवाळखोर करणारी मुले आढळून आल्यास शाळा व महाविद्यालय परिसरात तक्रार बॉक्स, फोन, मॅसेज व व्हाटसॲपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिले आहे.

Protected Content