यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. ६ मार्च रोजी संपन्न झाली. त्यात लोकशाही पॅनलचा पराभव करत शेतकरी पॅनलच्या गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला .
निवडणूकीत शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते –
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातील भादले उमाकांत हुना ( २५० ), भंगाळे जितेंद्र सुरेश ( २४४ ), चौधरी ललित शांताराम ( २१७ ), डॉ. चौधरी विवेक दिवाकर ( २८८ ), महाजन प्रवीण पांडुरंग ( २७४ ), सरोदे सुहास सोपान ( २२९ ), सरोदे टेनीराम मुरलीधर ( २३६ ), सोनवणे बाळकृष्ण पंडित ( २२३ ), महिला राखीव मतदार संघ फालक कांचन ताराचंद ( ३२१ ), फालक सुजाता गोपाळ ( २५४ ), इतर मागास वर्ग मतदारसंघ फालक भिमराव वसंत ( २३५ ), अनुसूचित जाती जमाती कोळी राजू दिनकर ( २५५ ), भटक्या जाती विमुक्त जाती विशेष मागास वर्ग मतदारसंघ कोळी गोकुळ मुकुंदा ( २६५ ), मत “शेतकरी पॅनलला मिळाली.
तर प्रतिस्पर्धी लोकशाही पॅनलचे माजी चेअरमन रामचंद्र विष्णू चौधरी यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. या संस्थेचे ५३३ सभासद असून ४८० मतदान सभासदांनी मतदानात भाग घेऊन आपला हक्क बजावला. निवडणूक अधिकारी म्हणून एम .पी .भारंबे व सेक्रेटरी संजू पाटील सह कर्मचारी वृंद यांनी मतदान प्रक्रियेत सहकार्य केले.
लोकशाही पॅनलचे नेतृत्व डॉ.विवेक दिवाकर चौधरी तहसील यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई पुरूजीत चौधरी व सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा डांभुर्णी गावचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुरुजित चौधरी यांनी नेतृत्व केले. डांभुर्णीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे ज्या निवडणुकीत १३ पैकी १३ जागा एक पॅनलच्या निवडून आल्या.