वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे झाडे उन्मळून घरावर पडली व काही ठिकाणी विद्युत खांब पडल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी अचानक तीन वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली, सोसाट्याच्या जोरदार वाऱ्यामुळे सिद्धेश्वर नगर परिसरातील मोठी मोठी झाडे उन्मळून घरावर ती पडली, काही ठिकाणी तर झाडे विद्युत डीपी वरती पडल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, त्याचप्रमाणे विद्युत चे खांबही मोडून घरावरती पडले आहेत त्यामुळे या भागातील काही घरांचे नुकसान झाले आहे