जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील पाटीलवाडा परिसरात मध्यरात्री मालवाहू चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील पाटील वाडा येथे बापू ओंकार महाजन (वय-४५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांनी त्यांची मालवाहू चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ४४८७) ही घराच्या समोर असलेल्या मोकळ्या जागी पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक करून मालवाहू चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान केले. हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.