यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील काही भागात वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने आज याचे पंचनामे केले.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरासह परिसरातील गावे पिंप्री गावातील १० घरे पडुन ४० हजार रुपयांचे व२५ हेक्टर केळी पिक,भालशिव गावतील ४ घरे कोसळून १० हजारांचे व५ शेतकर्यांचे १० हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले, विरावली येथील ११ शेतकर्यांचे १५ हेक्टर केळी पिक, वढोदे प्रगणे यावल ७ घरांचे ४० हजारे नुकसान झाले आहे. तसेच नावरे येथील १२ शेतकर्यांचा १६ हेक्टर केळी पिकांचे, त्याचबरोबर शिरसाड येथे १ घरांचे भिंत कोसळुन त्यात२५ हजाराचे आणी ६५ शेतकर्यांच्या ६९.४८ केळीचे नुकसान झालेत, साकळी येथे २० शेतकर्यांच्या १०.३५ हेक्टर केळी, मनवेलच्या३ शेतकर्यांच्या २.३० हेक्टर व दगडी येथील १ शेतकरी बांधवाचे १.०४ हेक्टर आणी थोरगव्हाण येथील ४ शेतकर्याच्या १.७८ हेक्टर केळी पिकांचे या वादळी वार्यासह आलेल्या तुफान पावसात नुकसान झाले आहे.
दरम्यान, आज तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्व पंचनामे कृषी विभागाच्या सहकार्याने तथा तलाठी आणी मंडळ अधिकारी यांनी केले. या सर्व पंचनामा अहवालानुसार तालुक्यात वादळी वार्यात विविध ठिकाणी २२घरे कोसळुन १ लाख१५ हजार रुपयांचे तर२५६ शेतकरी बांधवाच्या २८२.९५ हेक्टर वरील केळी पिकांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे.