पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूरसह परिसरात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्यांनी मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पहूर व परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्यामध्ये कपाशी ज्वारी मका या पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे कपाशी, मका व ज्वारीला कोंब आले आहेत. ऐन दिवाळीत शेतकर्यांना नुकसान सहन करत लागल्यामुळे दिवाळीला काही शेतकर्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिणामी, पहूर येथील बाजारपेठ दिवाळीत शुकशुकाट दिसत असल्यामुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. दरम्यान, सरकारने नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी होत आहे.