जळगाव प्रतिनिधी । शहरातील डेअरी डॉन या आईसस्क्रीम पार्लरमध्ये नैसर्गिकरित्या तयार केलेल्या आईसक्रीमच्या विविध व्हरायटीज आणि लज्जतदार स्नॅक्सचा निवांत आस्वाद घेण्याची अतिशय प्रशस्त अशी सुुविधा असून याला जळगावकरांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
जळगावकरांची गरज
वाढत्या तापमानामुळे जळगावकर अक्षरश: हैराण झालेले आहेत. यामुळे आईसस्क्रीमचा गारेगार गोडवा हा सर्वांना आकृष्ट करून घेत आहे. खरं तर, जळगाव शहरात अगदी लोटगाड्यांपासून ते अद्ययावत पार्लर्समध्ये आईसक्रीम खाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तथापि, आईसक्रीमसह अन्य दुग्धजन्य शीत पदार्थ आणि अतिशय खमंग अशा स्नॅक्ससह अगदी निवांतपणे आस्वाद घेण्याची सुविधा कुठेही नाही. जळगावकरांची नेमकी हीच मागणी लक्षात घेऊन श्रीकांत महाजन यांनी डेअरी डॉन या ख्यातप्राप्त आईसक्रीम ब्रँडची शहरात फ्रँचायझी सुरू केली आहे. ‘डॉन’ म्हटल्यावर आपल्यासमोर भारदस्त व्यक्तीमत्व उभे राहते. हाच भारदस्तपणा डेअरी डॉनमध्ये आपल्याला येथे पदोपदी अनुभवायला मिळतो. या शॉपीतील सर्वात लक्षणीय आणि डोळ्यात भरण्याजोगी बाब म्हणजे येथे अतिशय प्रशस्त जागेत बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकाच वेळी जवळपास ७० ग्राहकांना सेवा पुरवता येईल इतकी याची क्षमता आहे. विशेष म्हणजे जागा मोठी असल्यामुळे अगदी निवांतपणे आपल्या आप्तांसोबत गप्पा मारून आपण आईस्क्रीम व स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकतात.
प्रसन्न अंतर्गत सजावट
डेअरी डॉन हे दालन अतिशय रसिकतेने सजविण्यात आले आहे. यामुळे येथे अतिशय प्रसन्न वाटते. एक तर हे पूर्णपणे वातानुकुलीत असून आसन व्यवस्थादेखील एखाद्या टॉप लेव्हलच्या शॉपीज प्रमाणे करण्यात आलेली आहे. याच्या जोडीला असणारे मंद संगीत हे ग्राहकाला धुंद केल्यावाचून राहत नाही. ग्राहक त्याला हव्या असणार्या संगीताची फर्माईशदेखील करू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे स्वच्छता व टापटीपपणा असून अतिशय तत्पर असा सेवकवृंद आहे. स्वत: संचालक श्रीकांत महाजन हे अगत्याने ग्राहकांचे स्वागत करत असल्याचे आपल्याला दिसून येते.
आस्वादाचे अनेक पर्याय
डेअरी डॉनमध्ये प्रत्येकी ३५ प्रकारचे आईसक्रीम आणि शेक्स उपलब्ध आहेत. तर येथे २० विविध फ्लेवर्समध्ये मस्तानी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथील सर्व प्रॉडक्ट हे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेले आहेत. यात कोणतेही केमीकल अथवा घातक पदार्थ नसल्याची बाब लक्षात घेण्याजोगी आहे. म्हणजेच येथील आंबा, सिताफळ, अननस आदी पदार्थांच्या गरापासून (पल्प) आईसक्रीम आणि शेक्स तयार करण्यात येतात. आजकाल बहुतांश लोक हे आरोग्याविषयी खूप सजग आहेत. त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. घातक रसायनांनी युक्त असणारे आईसक्रीम व शेक्स हे गल्लोगल्ली मिळत असतांना शुध्द नैसर्गिक स्वरूपातील प्रॉडक्ट हे फक्त आणि फक्त डेअरी डॉनमध्येच उपलब्ध आहेत.
बहुपर्यायी लज्जतदार स्नॅक्स
याच्या जोडीला डेअरी डॉनमध्ये सध्या लोकप्रिय असणारे पिझ्झा, फ्राईज, सँडविच आदी स्नॅक्सदेखील आहेत. यात पिझ्झा पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये कुणीही आपल्याला हव्या त्या स्वादाच्या पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकतो. येथे फ्राईजदेखील उपलब्ध आहे. यात शेजवान, चिली, गार्लीक, पेरीपेरी आदी विविध प्रकार उपलब्ध आहेत. तरूणाईची पसंत असणारे ग्रील सँडविचदेखील येथे आहेत. यात चीज, चिली, कॉर्न आदी प्रकार आहेत. विशेष म्हणजे येथे तंदुरी सँडविचही उपलब्ध असून हा एक वेगळा प्रकार खवैय्यांच्या पसंतीस उतरू शकतो.
पार्टीजसाठी स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान, डेअरी डॉनमध्ये ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक ऑफर्सदेखील दिल्या जात असल्याची माहिती श्रीकांत महाजन यांनी दिली. सध्या येथे प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला ‘फ्लेवर ऑफ द मंथ’ असणार्या चवीचे प्रॉडक्ट फक्त २० रूपये या सवलतीच्या दरात मिळते. तर येथे बर्ड-डे पार्टीज, किटी पार्टीज तसेच अन्य लहानमोठे कार्यक्रमही घेता येतात. यासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. डेअरी डॉनमधील सर्व प्रॉडक्ट हे ऑनलाईन पध्दतीत घरपोच मागविण्याची सुुविधादेखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. झोमॅटो आणि अलीकडेच दाखल झालेल्या स्वीगी या अॅपवरून आपण डेअरी डॉनमधील सर्व खाद्य पदार्थ घरपोच मागवू शकतात. जळगावकरांच्या सेवेत आपण अविरतपणे असून शहरवासियांनी आपल्या या प्रशस्त दालनास एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन श्रीकांत महाजन यांनी केले आहे.
संपर्क :
डेअरी डॉन
नंदिनीबाई मुलींच्या महाविद्यालयाच्या समोर,
पहिला मजला
जळगाव
क्रमांक : ९१४५७०९९५५
८४४६०३७७०८
गुगल मॅप्सवरील अचूक लोकेशन
पहा : डेअरी डॉनबाबत सांगोपांग माहिती देणारा व्हिडीओ.