Home Cities एरंडोल एरंडोल येथे दोन ठिकाणी दहीहंडीचे आयोजन

एरंडोल येथे दोन ठिकाणी दहीहंडीचे आयोजन


erandol dahihandi

एरंडोल, प्रतिनिधी | शहरात नगरपालिका परिसर व मरीमता चौक आशा दोन ठिकाणी दहीहंडीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

नगरपालिका परिसरात दहीहंडीचे आयोजन ज्ञानदीप मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते. ही दहिहंडी ज्ञानदीप मित्रमंडळाच्या सदस्यांनीच पहिल्या प्रयत्नात गोविंदा राकेश भोई याने फोडली. मरीमता चौकातील दहीहंडी मरीमता चौक मित्र मंडळाच्या सदस्यांनीच फोडली. या दहीहंडीचे आयोजन माजी उपनगराध्यक्षा छाया आनंद दाभाडे यांनी केले होते. दहीहंडीचे पूजन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एरंडोल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

 


Protected Content

Play sound