चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – युवानेते मंगेश चव्हाण

chalisgaon news 2

चाळीसगाव प्रतिनिधी । समाजकारणातून राजकारण हा माझा पिंड असून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात वावरत आहे. 2012 साली पंचायत समिती निवडणूक असो की इतर सामाजिक उपक्रम हे सर्व उपक्रम अनेक वर्षापासून राबवत आहे. सामाजिक व राजकीय जीवनात नवखा नाही. ज्या समाजातून, ज्या गावातून मी लहानाचा मोठा झालो, ज्या तालुक्याने माझ्यावर भरभरून प्रेम केले, त्या तालुक्याला सुजलाम सुफलाम करून प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीने जर संधी दिली तर अधिक जोमाने व प्रामाणिकपणे लोकसेवेसाठी काम करता येईल. माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारी सर्व माणसे, माझ्यापेक्षा वरिष्ठ असणारी या सर्वांचे मी आभार मानतो, असे प्रतिपादन सिताराम पैलवान मळा येथे मंगेश दादा चव्हाण मित्र परिवाराकडून आयोजित वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मंगेश चव्हाण यांनी केले. या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व विविध पक्षातील नेत्यांनी, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगेश चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

चाळीसगावात लाडू तुला उत्साहात
अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सुरुवातीला मंगेश चव्हाण यांची लाडू तुला करण्यात आली. 74 किलो लाडू त्यांच्या 74 किलो वजना इतके वापरण्यात आले. हे 74 किलो लाडू नंतर उपस्थित लोकांना वाटप करण्यात आले. मागील वर्षी वाढदिवशी चाळीसगाव शहरात पंचवीस लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे व सात मिनि सायन्स लॅब देण्यात आलेल्या होत्या. त्याचप्रमाणे ह्या वर्षी मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने चाळीसगाव तालुक्यातील ४ शाळांना चार मिनी सायन्स लॅब, पाच गावांना व्यायामाचे साहित्य, शहरात अकरा ठिकाणी खुली वाचनालय देण्यात आली. चाळीसगाव तालुक्याच्या विकासाचा अजेंडा या वाढदिवसानिमित्त मंगेश चव्हाण यांनी मांडला. त्यात 7 गावे शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर दुष्काळमुक्त करणे, १०० एकर वर टेक्स्टाईल पार्क, सिंचन प्रकल्प, गरिबांना घर, शिक्षणाच्या सोयी-सुविधा, अत्याधुनिक हॉस्पिटल व इतर लोकोपयोगी कामे करण्याचे आश्वासन यानिमित्ताने दिले.

शिवसह्याद्री नाटक अभूतपूर्व
शिवसह्याद्री या नाटकाच्या निमित्ताने चाळीसगाव करांना अभूतपूर्व असे शिवशंभूच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारे निर्माते-दिग्दर्शक ॲड.विनय दाभाडे यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार मंगेश चव्हाण यांच्याकडून करण्यात आला. तसेच या नाटकातील सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हाभरातून वेगवेगळ्या पक्षातील, हितचिंतक, मित्र व नेत्यांची उपस्थित होती. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जि.प.सदस्य प्रतापदादा पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासबापू सूर्यवंशी, महिला आयोगाच्या सदस्या देवयानीताई ठाकरे, अंबाजी ग्रुपचे चित्रसेनदादा पाटील, शिवसह्याद्री महानाट्याचे दिग्दर्शक ॲड.विनय दाभाडे, नगरसेविका संगीताताई गवळी,रोहिणीचे सांगळे सर, संभाजी सेनेचे लक्ष्मण बापू शिरसाठ, सायगांवचे सुरेशतात्या सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष के.बी. दादा साळुंखे, ॲड.धनंजय ठोके, सावदा चे नगराध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली .

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ नेते के.आर. पाटील, ठाणसिंगआप्पा पाटील, रविंद्र चुडामण पाटील, शेषराव बापू पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करणदादा पवार, आर्किटेक किरण देशमुख, शहराध्यक्ष घ्रुष्णेश्वर तात्या पाटील, नगरसेवक सोमसिंग राजपूत, बापू अहिरे, चंदू तायडे, भास्कर पाटील, विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, विश्वास चव्हाण, शिवसेनेचे नानाभाऊ कुमावत, रवींद्र केदार सिंग पाटील, माजी पं.स.सदस्य सतीश पाटे, पंचायत समिती सदस्य सरदार शेट राजपूत, जळगांवचे अमित पाटील,अजयभाऊ शुक्ल,रमेश सोनवणे, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, भाऊसाहेब जगताप, झेलाबाई पाटील, अतूल पाटील, मंगेश राजपूत, छोटू पाटील, अनिलभाऊ नागरे, धनंजय मांडोळे, प्रभाकर चौधरी, वाय.आर.सोनवणे सर, विवेक चौधरी, राजेंद्र पगार, एम.बी.पाटील, कपिल पाटील, युडी माळी सर, माजी नगरसेवक सुशील वानखेडे, यांच्यासह सह सर्व नगरसेवक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच, यूवामोर्चा व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिवसह्याद्री महानाट्यात सहभागी झालेले कलाकार व त्यांचे पालक वर्ग, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाळीसगाव तालुक्यातील आश्वासक नेतृत्व म्हणून मंगेशदादा चव्हाण यांचेकडे पाहिले जात असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सुनील निकम आणि प्रदीप देसले यांनी केले.

Protected Content