जळगाव, प्रतिनिधी | येथील नवी पेठ गणेश मंडळ चौकात शनिवारी दि. २४ रोजी दहीहंडीचा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. नवी पेठ युथ फोरम, नवी पेठ गणेश मंडळ, युवा गर्जना फौंडेशन तर्फे हा दहीहंडी महोत्सव होणार आहे.
या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण म्हणून जिल्ह्यातील एकमेव अव्यावसायिक युवा गर्जनाचे १०० वादकांचे ढोल पथक कार्यक्रमात रंगत आणणार आहे. प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजन करण्यात आले असून सुरक्षेची काळजीदेखील घेण्यात आली आहे. क्रेनद्वारे दहीहंडी लावली जाणार असून ती १५ फुट उंच असणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी केले आहे.