भारताला आमच्याशी बोलण्याची इच्छाच दिसत नाही – इम्रान खान

imran khan ap

इस्लामाबाद, वृत्तसंस्था | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याने नरेंद्र मोदी सरकारशी आता संवाद शक्य नाही, असे सांगितले आहे. अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खानने भारतावर गंभीर आरोप लावले आहेत. त्याने सांगितले की, आम्ही भारताशी चर्चा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. मात्र मला वाटते की, भारताला आणि त्यांच्या पंतप्रधानांना अशाप्रकारचा कोणताही संवाद ठेवण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता भारताशी चर्चा होणार नाही, हे स्पष्ट आहे.

 

दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत, त्यात युद्ध झाले तर धोका वाढत जाईल, असे तो एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाला. भारताकडून जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान आणि त्याचे मंत्रीही युद्धाची भाषा बोलत आहेत.

Protected Content