जळगाव, प्रतिनिधी | येथील काव्यरत्नावली चौकात “तरुणींची दहीहंडी” २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या उत्सवाचे वैशिष्ट म्हणजे शहरात प्रथमच महिला गोविंदा दहीहंडी फोडणार आहेत.
युवाशक्ती फौंडेशन, विद्या इंग्लिश मिडीयम विद्यालय, ज्ञानयोग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नमो आनंद नोटबुक प्रायोजित जळगावात महिला गोविंदाची दहीहंडी पथके बनविण्यात आली आहे. पुरुषांसह महिलांचा दहीहंडी उत्सवात सहभाग वाढावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. मुंबई येथील प्रशिक्षकानी महिला गोविंदाना प्रशिक्षण दिले आहेत. अमळनेर येथील सिद्धार्थ व्यायाम शाळाचे १०० वादकांचे ढोल पथक देखील महिला गोपिकांचे मनोबल वाढविणार आहेत. तसेच रोप मल्लखांबाचेही प्रात्यक्षिक होणार असून श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा विध्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार आहेत. तसेच लकी ड्रो काढण्यात येणार असून विजेत्यांना गिफ्ट मिळणार आहे. याशिवाय सेल्फी स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य सादर होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना.गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, आ.सुरेश भोळे, अप्पर एसपी भाग्यश्री नवटके, उद्योजक अशोक जैन, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन लढा, अनंत जोशी, उद्योजक भरत अमळकर, जितेंद्र कोठारी, अनुभूती विद्यालयाच्या संचालिका निशा जैन, रायसोनी इन्स्तीट्युटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, संगीता पाटील, आयएमआर संस्थेच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे, अ.भा.मारवाडी महिला मंडळाच्या राजकुमारी बालदी हे उपस्थित राहतील. शहरात प्रथमच महिलांची दहीहंडी आयोजित असल्याने प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, अध्यक्ष मनजित जांगीड यांनी केले आहे.