मुंबई वृत्तसंस्था । राज्यात दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. तथापि यावर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नाही. त्यामुळे यंदा दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे.
दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा केला जाणार आहे.