जळगाव प्रतिनिधी । दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञातांनी एका महिलेची १८ हजार किमतीची पोत लंपास केल्याची घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास तांबापुऱ्यातील मच्छीबाजार येथे घडली होती, यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबत एमआयडीसी पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तांबापुरा येथे राहणाऱ्या अफरोज शेख शकील (वय ३२) ह्या दुपारी ती वाजेच्या सुमारास शेजारच्या महिलेसोबत गप्पा मारत असताना दोन अनोळखी इसम भांड्याना पॉलिश करून देतो असे सांगितले. आम्ही दागिन्यांनाही करून देतो असे सांगितले. तसेच महिलेने चांदीची अंगठी दिली. ती दोघांनी पॉलिश करून दिली. तसेच सोन्याचे दागिने आहेत का ? अशी विचारणा करून अफरोज शेख यांनी पोत काढून दिली. एका पाऊचमध्ये सोन्याची पोत ठेऊन १५ मिनिटानंतर पोत काढून घ्या असे सांगितले. त्यांना किती पैसे झाले असे विचारले असता पुढच्या आठवड्यात येऊ तेव्हा द्या असे सांगून ते निघून गेले. पाऊचमध्ये पोत पाहिली असता ती दिसून आली नाही. त्यांनी १८ हजार किमतीची पोत लंपास केली. महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद
तांबापुऱ्यातून महिलेची पोत लंपास झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी सहाय्यक अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पोना विजय पाटील, मनोज सुरवाडे, इमरान सैय्यद, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांनी पथक तयार करून संशयित आरोपी पप्पू शामसहा थटेरी (वय-33)रा. एकडरा, ता. टाहलगाव जि. भागलपूर, बडचुन (बिहार) याला अटक करून त्याच्या ताब्यातील 18 हजार रूपयाची सोन्याची पोत हस्तगत केली आहे.