‘दबंग-३’ चित्रपट अडचणीत

dabang3

 

मुंबई प्रतिनिधी । ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. ‘दबंग-३’ येत्या ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असून चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सलमानच्या ‘हुड हुड दबंग’ गाण्यात साधू-संतांना नृत्य करताना दाखविले आहे. गाण्यात साधू-संताना नृत्य करताना दाखविणे हा धर्माचा आणि हिंदुस्तानाचा अपमान असल्याचे समितीने म्हटले आहे. ‘दबंग-३’ या चित्रपटातून धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळण्यात यावा आणि तोपर्यंत चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न देण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने नुकतीच केली आहे. सोशल मीडियावरही सलमान खान आणि ‘दबंग-३’वर टीका होत आहे. ट्विटरवर ‘#BoycottDabangg3’ असा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

हुड हुड दबंग या गाण्यावरून वाद रंगल्यानंतर अद्याप सलमान खान व चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आणि संवादांवर संभाजी ब्रिगेडनं खुलासा मागितला होता.

Protected Content