फैजपूर प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय येथे झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन खेळ प्रकारात जळगाव विभागातील एकुण 09 महाविद्यालयातील पुरुष आणि महिलांनी क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी डॉ. उमेश पिंपळे हे उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल सरोदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ क्रिडा संचालक डॉ.किशोर पाठक , क्रीडा संचालक प्रा. सतिष कोकटा , निवड समिती सदस्य डॉ.सचिन झोपे , क्रीडा संचालक प्रा. सुभाष वानखेडे, जिमखाना समिती चेअरमन प्रा. डॉ. सतिष चौधरीउपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी डॉ.उमेश पिंपळे यांनी सांगीतले कि, खेळ हा आरोग्यासाठी लाभदायक आहे व खेळासाठी वयाची अट नसते. खेळामध्ये शरीराचा घाम गाळत असतो. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. ज्यांची निरोगी काया आहे त्यांना आमच्यासारख्या डॉक्टरांची गरज भासत नाही. खेळामधुन रोजगार सुद्धा निर्माण होतो. भारत सरकारने खेळाडूंसाठी वेगळी रोजगार संधी निर्माण करुन ठेवली आहे. हि संधी आपण घ्यायला हवी. राखीव जागांमध्ये आपण आपल्या कर्तुत्वानुसार रोजगार मिळवी शकतो. त्यानंतर डॉ. उमेश पिंपळे यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल सरोदे यांनी सांगितले कि, आमच्या महाविद्यालयाला हि स्पर्धा आयोजीत करण्याची जी संधी विद्यापीठाने आम्हाला दिली त्याबद्दल प्रथमतः मी महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाचे आभार प्रकट करतो. या महाविद्यालयामध्ये ज्या सुविधा आहे त्या प्रत्येक खेळाडुसाठी उपलब्ध आहे व तुम्हाला काही कमतरता भासत असल्यास आम्हाला सांगा तुमच्या आपेक्षा आम्ही पुर्ण करण्यास बाधील राहू. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.डॉ.जी.एस.मारतळे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. सतिष चौधरी यांनी केले तर आभार युवराज गाढे यांनी मानले.
वरील स्पर्धेत पुरुष गटामध्ये अँड.एस.ए.बाहेती, विजयी , नुतन मराठा महाविद्यालय उपविजयी आणि धनाजी नाना महाविद्यालय तृतीय स्थानी राहीले. तर महिला गटामध्ये डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय विजयी, नुतन मराठा महाविद्यालय उपविजयी तर मु.जे. महाविद्यालय तृतीय स्थानी साहिले. या स्पर्धेच्या पारितोषक वितरण प्रसंगी जिमखाना समितीचे चेअरमन प्रा.डॉ.सतिष चौधरी अध्यक्ष स्थानी होते व प्रमुख पाव्हुणे डॉ.किशोर पाठक वरिष्ठ क्रिडा संचालक, प्रा. सतिष कोकटा क्रीडा संचालक, डॉ.सचिन झोपे निवड समिती सदस्य, प्रा. सुभाष वानखेडे क्रीडा संचालक. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.डॉ.जी.ए.मारतळे यांनी केले तर पंच म्हणुन प्रा. जयंत जाधव व अक्षय येवले, योगेश राऊत, सागर हचदिया यांनी कार्य केले. तसेच तांत्रिक समितीचे सदस्य म्हणुन डॉ.किशोरजी पाठक वरिष्ठ क्रिडा संचालक यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज गाढे, आर.डी.ठाकुर, तुषार सपकाळे, शेख अमीर, कैलाश मेढे, किरण जोगी आणि सर्व खेळाडू मित्र आदिंनी सहकार्य केले.