जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील सायकल स्पेअर पार्टचे गोडाऊन फोडून २ लाख ६७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याची घटना उघडकीला आला आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती की, जळगाव शहरातील रहिवासी मुकेश सत्यनारायण राठी यांचे कुसुंबा येथे सायकल स्पेअर पार्टचे गोडाऊन आहे. ८ मार्च रोजी सकाळी ११ ते २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे मागची भिंत तोडून आत प्रवेश करत २ लाख ६७ हजार २०० रुपये किमतीचे सायकल स्पेअर पार्ट व टायर चोरून नेले. सर्व गोष्टी झाल्यानंतर मालक मुकेश राठी यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.