विद्यापीठात जागतिक सायकल दिनानिमित्त ‘सायकल रॅली’

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । “सायकल चालवा व पर्यावरण वाचवा” असा संदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला झेंडा दाखवितांना दिला.

यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. दीपक दलाल, जिल्हा  सायकलींग असोसिएशनचे अध्यक्ष महेश सोनी,  रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे उपस्थित होते.

प्रा.इंगळे पुढे म्हणाले की, वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाचा असमतोल होत असून मोठया प्रमाणावर ऱ्हास होत आहे. सायकलचा वापर मोठया प्रमाणात केल्यास इंधन बचत होऊन प्रदुषणास आळा बसेल आणि सायकल चालविल्याने शरीरालाही फायदा होईल. त्यामुळे सर्वांनी सायकलचा वापर करुन निसर्ग वाचवावा असे आवाहनही केले. प्रास्ताविक करतांना संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी सांगितले की, जागतिक सायकल दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रासेयोचे ७५ स्वयंसेवक उपस्थित होते.  प्रा.इंगळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ केला.

या सायकल रॅलीमध्ये सहायक कुलसचिव एन.जी.पाटील, डॉ. दीपक सोनवणे, समीर रोकडे, वैशाली शर्मा, रुपेश महाजन, स्वप्नील मराठे, इरफान पिंजारी, सुनील चौधरी, निलेश चौधरी, संभाजी पाटील, अरुण सपकाळे, चंदन मोरे, आकाश भामरे, नरेंद्र पाटील, विलास पाटील, अक्षय  महाजन, नितीन चौधरी, विजय बिऱ्हाडे,  रासेयो स्वयंसेवक व सायकलपटूंचा समावेश होता. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.

 

Protected Content