जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |आज आपण पूर्वीपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अवलंबून आहोत. आजकाल बेकायदेशीर हॅकिंगच्या वाढत्या प्रमाणामुळे तसेच ऑनलाईन फ्रॉडमुळे आपला डेटा लोकांपासून सुरक्षित करण्याची गरज वाढली आहे.
सायबर सुरक्षा म्हणजे संगणक, सर्व्हर, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, नेटवर्क यांचा डिजिटल हल्ल्यांपासून बचाव करणे. संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली,सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यासारख्या इंटरनेट शी जोडलेल्या सिस्टम्सचे डिजिटल हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तंत्र म्हणजे सायबर सुरक्षा.आज आपण डिजिटल युगात आहोत आणि पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानावर अवलंबून. त्यामुळे सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे.
आजच्या जीवनात मुलांना मोबाईल म्हणजे त्यांचे जीवन झालेले आहे आपल्या जीवनातील भरपूर गोष्टी या मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर यांवर अवलंबून आहेत. परंतु या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जेवढे फायदे होतात तेवढे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यासाठी गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुलांना सतर्कता इशारा देण्यासाठी, विविध प्रकारच्या धोक्यांपासून वाचण्यासाठीसायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन केले.
या कार्यशाळेला गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रोफेसर प्रशांत डी शिंपी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. ऍप्लिकेशन मधील त्रुटींमुळे गोपनीय माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित कोडिंग करणे, ऍप डिझाईन करणे आवश्यक असते जेणेकरून सायबर हल्यांपासून वाचता येईल. मालवेअर हे एक सॉफ्टवेअर आहे जे एखाद्या सिस्टममध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
या प्रकारच्या मालिशिअस सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस, वर्म्स, रॅन्समवेअर आणि स्पायवेअर यांचा समावेश असतो. लिंक वर क्लिक केल्याने सॉफ्टवेअर इंस्टॉल होते ज्यातून मालवेअर आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये येते. आणि अनावधीकृतपणे आपली संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते तसे होऊ नये म्हणून प्राध्यापक प्रोफेसर प्रशांत शिंपी यांनी सायबर सुरक्षा टिप्स मध्येसायबर सुरक्षा जागरूकता निर्माण करा, प्रशिक्षण घ्या, सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम वेळोवेळी अपडेट करणे, अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर, डेटा बॅकअप करणे, सार्वजनिक ठिकाणचा किंवा कुठलाही असुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा वापर टाळणे, अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेचे ईमेल न उघडणे, कठीण पासवर्ड चा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सायबर सुरक्षेचे प्रकार अॅप्लिकेशन सुरक्षा, क्लाउड सुरक्षा, मोबाईल सुरक्षा, ओळख व्यवस्थापन व डेटा सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा, माहिती सुरक्षा याबद्दलही अनमोल असे मार्गदर्शन केले. स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले कार्यक्रमाला इयत्ता आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.