सायबर सिक्युरिटी ही काळाची गरज : कॅप्टन आनंद नायडू

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन बँगलोर येथील इंफॉर्मेशन शेअरिंग एंड एनालिसिस सेंटरचे संचालक जीपी कॅप्टन पी. ए. नायडू यांनी केले.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे तसेच नॅशनल सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया अॅन्ड सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १० व ११ जानेवारी रोजी “सायबर सिक्युरिटी समिट” या शीर्षकाखाली दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या समिटच्या पहिल्या दिवशी कॅप्टन नायडू यांच्यासोबतच गोवा येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे डॉ. अजित मुजुमदार, हैदराबाद येथील सायबर सेक्युरिटी कन्सल्टंट प्रा. आशुतोष म्हैसकर व मुंबई येथील ट्रीज इन्फाचे संचालक मयुरेश भागवत या वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविकेत नमूद केले की, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते, “सायबर सिक्युरिटी समिट” या कार्यक्रमाचा उद्योजक, संशोधक, प्राध्यापक व विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व मार्गदर्शकाचे सकारात्मक अनुभव त्याचा प्रॅक्टीकल अभ्यास याने विध्यार्थ्यांना एक नवी वाटचाल मिळेल तसेच आज आपलं जगणं हे डिजिटल होत चाललं आहे. हे केवळ आपण वापरत असलेल्या गॅजेट्समुळेच नाही तर रोजच्या व्यवहारातील असंख्य गोष्टीच्या कारणाने एकमेकांशी इंटरनेट अथवा संगणकीय जाळ्याच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. प्रचंड मोठय़ा प्रमाणात माहितीचे आदानप्रदान होत आहे, त्याचबरोबर प्रचंड असे माहितीसाठे तयार होत आहेत आणि कोणालाही हे सारे टाळून पुढे जाणे शक्य होणार नाही. अर्थातच या सर्व माहितीजाळ्याची, माहितीसाठय़ाची सुरक्षा हा कळीचा घटक ठरतो. कारण असे माहितीसाठे, माहितीजाळे हे मौल्यवान असतात. डिजिटल जगात याला संपत्तीचे मोल आहे. त्यामुळे डिजिटल जगात चोरीची संकल्पनादेखील बदलली आहे. या माहितीजाळ्यावर, साठय़ावर होणारा हल्ला हा त्या त्या कंपनीचे, आस्थापनांचे आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो. हे सर्व होते ते सायबर विश्वात. कारण आज या सर्व बाबी अनेक घटकांशी जोडलेल्या असतात आणि अर्थातच त्यामध्ये करिअरच्या अगदी असंख्य म्हणाव्या इतक्या संधी दडलेल्या आहेत. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यानंतर समीट मधील प्रमुख वक्ते पी. ए. नायडू यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि, सध्या देशभरात सायबर गुन्ह्याची संख्या वाढत आहे. वेगवेगळ्या प्रलोभनाला बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान करुन घेणारे अनेक लोक भेटतात. विद्यार्थ्यांनाही लुटण्याचे प्रकार घडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्व देशांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग करुन आपल्या सुख सुविधा पूर्ण केल्या. परंतु, याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग काही देश व व्यक्तींकडून होताना दिसून येतो यातूनच गुन्हे घडले जातात. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फसवणूकीचे अनेक प्रकार घडत आहेत. बँक फ्रॉडमध्ये गुन्हेगार ग्राहकाला चुकीची माहिती देऊन त्याच्याकडून बँक अकाउंट नंबर व ओटीपी घेऊन त्याच्या खात्यातील सर्व पैसे काढून घेतो. जॉब फ्रॉडमध्ये विविध प्रकारच्या लिंकचा उपयोग करुन युवकांना जॉबची लालच दाखवून फसवणूक केली जाते. मॉरफिंग फ्रॉडमध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवर डुप्लीकेट अकाउंट तयार करुन फसवणूक केली जात असल्याची माहिती कॅप्टन नायडू यांनी दिली. यानंतर गोवा येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे डॉ. अजित मुजुमदार यांनी रँम्सवेयर अटॅक यावर मार्गदर्शन करत सांगितले कि, रँम्सवेयर एक मेलवेयर व्हायरस आहे. जे अनइंस्टॉल झाल्यानंतरही कोणत्याही व्यक्तीला आपल्या कंप्यूटरचा वापर करण्यापासून रोखते. यूजरला पुन्हा कंप्यूटरचा वापर करण्यासाठी एक मोठी रक्कम पे करण्याचा धोका निर्माण होतो. हॅकर आपली गरज पूर्ण करतो. रँम्सवेयर चे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे यापासून कसं सुरक्षित राहता येईल. हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अज्ञात व्यक्तीने जर एखादी लिंक पाठवली तर तिला ओपन करू नका. आपल्या सॉफ्टेवेयरला अप टू डेट ठेवा. तुमच्याकडे एक मजबूत अँटी व्हायरस सुरक्षा रणनीती हवी. तरच तुम्ही या हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकता. त्यामुळे कुणीही काहीही पाठवले तरी त्यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्याची आधी खातरजमा करा. कोणतीही लिंक ओपन करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले, यानंतर हैदराबाद येथील सायबर सेक्युरिटी कन्सल्टंट प्रा. आशुतोष म्हैसकर यांनी सर्वाधिक ऑनलाईन असणाऱ्या तरुण पिढीला उद्देशून त्यातील फायदे आणि सोबतच मोबाईलच्या अति वापराचे धोके समजावून सांगितले. सध्या बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेच केले जातात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, किती सतर्क राहिले पाहिजे हे सविस्तरपणे सांगितले. सोशल मीडिया हा जसा चांगला तसाच त्याचे दुष्परिणाम सुद्धा म्हैसकर यांनी सांगितले. कोणताही व्यवहार करताना येणारा व्हेरीफिकेशन ओटीपीबाबत त्यांनी विशेष माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर मुंबई येथील ट्रीज इन्फाचे संचालक मयुरेश भागवत यांनी डिजिटल पेमेंट सुरक्षा आणि क्रिप्टोकरन्सीवर मार्गदर्शन करतांना म्हटले कि, भारतात गेल्याकाही वर्षात डिजिटल क्रांतीचे वारे वाहू लागले आहे. हा बदल केवळ स्वस्त इंटरनेट आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन एवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही. आर्थिक व्यवहारात देखील डिजिटल क्रांती घडली आहे. खासकरून, UPI अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतेच, UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला आहे. पण हे पेमेंट करतांना काही सुरक्षा वापरणे महत्वाचे आहे जसे कि, फक्त स्मार्ट अधिकृत अॅप्स वापरा, कंप्यूटर आणि मोबाईलची सुरक्षितता अपग्रेड करा, तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा आदि माहिती त्यांनी यावेळी दिली, यानंतर पहिल्या दिवसाच्या समारोप कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा याबाबत युवावर्गामध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे. अनेकदा विद्यार्थी मोबाईल, संगणक आणि इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याने, काहीतरी चूक भूल होण्याची शक्यता असते. आणि त्याच साठी योग्य वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. या अनुषंगाने महाविद्यालयात सायबर‎ सुरक्षा समिटचा विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी नमूद केले. समिटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ता. ११ रोजी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील या “प्रतिमा आणि व्हिडिओ बनावटीचे कायदेशीर परिणाम” या विषयावर तर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी पुणे येथील डॉ अरुण मिश्रा हे ट्रस्टेड कॉम्प्युटिंग या विषयावर तसेच प्रतिष्ठित पत्रकार शेखर पाटील हे एआय आणि पत्रकारिता: खोट्या बातम्यांविरुद्ध धोका आणि लढाई यावर तर जळगाव सायबर सेलचे दिगंबर थोरात व दिलीप चिंचोळे हे सायबर सुरक्षावर मार्गदर्शन करतील. सदर कार्यक्रमासाठी प्रा. प्रमोद गोसावी, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. पूजा नवाल, प्रा. योगिता धांडे, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. निलेश इंगळे, प्रा. तुषार वाघ, प्रा. डॉ. चेतन चौधरी, प्रा. रश्मी झांबरे यांनी सहकार्य केले तर प्रा. श्रिया कोगटा यांनी सूत्रसंचालन केले. तर सदर समिटचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

 

आय.एस.ए.सी.,बँगलोर सोबत करार

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्ष…

Protected Content