धरणगाव, प्रतिनिधी | येथील स्टेट बँक ग्राहकांना व शेतकऱ्यांना भोंगळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी कार्यरत असलेले व्यवस्थापक व कर्मचारी केव्हाही येतात व केव्हाही घरी निघून जातात, अशी बँकेची परिस्थिती आहे. याठिकाणी बँकेतील कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी बोलणे अरेरावीचे दिसून येते.
त्याचबरोबर बँकेत एखाद्या ग्राहकाने अकाउंट उघडले असता, त्याला सहा महिने पासबुकसाठी फिरवा-फिरव केई जाते. बँकेचे कर्मचारी वेळोवेळी कामचुकारपणा करतांना दिसून येतात. क्षुल्लक कारणे सांगून ग्राहकांना परतवून लावतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून लवकरात लवकर सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.