संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाबाबत उत्सुकता शिगेला !

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असून यात ते नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आज मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपच्या साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं म्हटलं होतं. त्यामुळे आता हे साडेतीन नेते कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांचे पहिले लक्ष्य हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   असल्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुक प्रतिज्ञापत्रात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय. न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही आयोगापासून माहिती लपवल्या प्रकरणी शिक्षा सुनावली होती. फडणवीस यांचं प्रकरण देखील त्याच स्वरुपाचं आहे. या प्रकरणात ते गोत्यात येण्याची शक्यता आहे. यासोबत  फडणवीस यांच्या भावावर देखील आरोप होऊ शकतात.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबै बँक प्रकरणात सध्या अडचणीत सापडलेत. त्यांनी मुंबै बँकेत मजूर म्हणून निवडणुक लढवल्यामुळे अडचणीत आहेत. हे प्रकरण आता औद्योगिक न्यायालयाच्या कोर्टात प्रलंबित असून, यावरून राऊत आरोप करू शकतात

यासोबत आमदार प्रसाद लाड यांच्यावरही या पत्रकार परिषदेत आरोप होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेत २००९ साली प्रसाद लाड यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. २०१४ मध्ये या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तब्बल शंभर कोटींपर्यंतचा हा घोटाळा असल्याची शक्यता असून राऊत याबाबत आरोप करण्याची शक्यता आहे.

 

 

 

Protected Content