पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी चोरीसह इतर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केले आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील कृष्णा गार्डन समोरून दिलीप शिवदास गोपाळे रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांची (एमएच १९ सीएम ६४५) क्रमांकाची दुचाकी १९ मार्च रोजी चोरी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी ही पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे रा. एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी परिसर, जळगाव याने चोरून नेल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, गोविंदा पाटील व सहायक फौजदार रवींद्र चौधरी यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनीत सापळा रचून शनिवारी २ एप्रिल रोजी रात्री सराईत गुन्हेगार चिच्या याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केली असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी चिच्या याच्या विरोधात यापुर्वी एमआयडीसी पोलिसात १३, रामानंद नगर व जिल्हा पेठला प्रत्येकी एक असे एकुण वेगवेगळे १५ गुन्हे दाखल असून त्यात आणखी दोन गुन्ह्यांची भर पडली आहे. चिच्याची रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरात प्रचंड दहशत आहे.

Protected Content