जळगाव प्रतिनिधी । शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त मोठी मूर्ती तयार केली व त्या मुर्तीची स्थापना केली म्हणून शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा देखील मिरवणूकांवर बंदी घालून सार्वजनिक मंडळांसाठी चार फुट तर घरगुतीसाठी २ फुट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीक नगरातील महर्षी वाल्मीक मंत्र मंडळ, सराफ बाजारातील साईनाथ मित्र मंडळ आणि रथ चौकातील श्रीराम तरूण सांस्कृतीक मित्र मंडळ या तीन गणेश मंडळाने शासनाने ठरवून दिलेल्या चार फुटपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मुर्ती स्थापन केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीनही मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी अश्या एकुण सात जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.