Home क्राईम गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर गुन्हा

गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर गुन्हा


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर यावल पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांनी पोलीसांना सुचना देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोकॉ अनिल साळुंखे यांनी गुरूवारी ३० डिसेंबर रोजी कारवाई करत शेख कलीम शेख रशीद (वय-३२) रा. सावखेडा ता. यावल याच्याकडून गोमांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ. अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound