जळगाव (प्रतिनिधी ) शनिवार ११ मे रोजी जळगाव शहरातील कालिका माता परिसरात मोटारसायकल चोरास स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ६ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.
स्थानिकगुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना प्रल्हाद कुंभार (रा. सुरवाडा बा ता. बोदवड) हा जळगाव शहरात हिरोहोन्डा फॅशन प्रो काळ्या रंगाची (एम.एच.१९ ओ.के.६५७७ ) ही चोरी केलेली मोटार सायकल घेवुन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने इसमाचा व मोटार सायकलचा जळगाव एम.आय.डी. सी, भाग, कालिका माता परिसरात शोध घेतला. यावेळी हिरोहोन्डा फैशन प्रो मोटार सायकल व चालक कालीका माता मंदिराजवळ आढळून आला. त्यास पथकाने सापळा रचुन ताब्यात घेऊन चौकशी केली. पथकाने त्याच्या जवळील मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता त्याने ही मोटार सायकल सुमारे एक ते दिड महीन्यापूर्वी भुसावळ शहरातुन खडका चौफुली परिसरातुन चोरी केल्याचे काबुल केले. यावेळी आरोपीने भुसावळ शहरातुन इतर ४ व रावेर वाघोड येथून एक पल्सर मोटर सायकल चोरी केली असल्याचे काबुल केले. प्रवीण कुंभारकडून १ लाख ३० हजार किमतीच्या एकूण ६ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. त्यास भुसावळ बाजार पेठ पोलिसांना दाखल गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, ही कारवाई स.पो.नि. सागर शिंपी, पोहेकॉ नारायण पाटील, पोना बापु पाटील, दिपक पाटील, योगेश पाटील, किरण चौधरी, महेद्र पाटील मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रविण हिवराळे, योगेश वराडे विकास वाघ दादाभाऊ पाटील, गफ्फारखा तडवी यांच्या पथकाने केली.