मोबाईल लांबविणार्‍या परप्रांतीय चोरट्याला अटक

mobile chor

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या मुलांच्या खोलीतून भल्या पहाटे अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल लांबविले होते. या चोरट्याला तिघांनी पकडून रामानंद पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. मुरगा कृष्ण वड्डी रा. बाजार पट्टी, नेल्लटी (आंध्रप्रेदश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.

चोरट्याने मुकबधिर असल्याचे केले सोंग
आज सकाळी 6.30 वाजता रूममेड असलेला जयेश पाटील हा क्लासला दुचाकीने गेला होता. अचानकपणे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आरोपी हा एम.जे.कॉलेजजवळील अग्रवाल हॉस्पिटलजवळ दिसला. त्याने महामार्गावरून जाणाऱ्या एका 407 गाडीवर बसला. संशयित चोराची चाचपणीसाठी जयेशने दुचाकीने 407 गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर गुजरात पेट्रोलपंपाजवळ उतरून एका ठिकाणी चहा पिला. त्यानंतर विदगाव रस्त्यावरून पायी जात तो चंदुअण्णा नगरातील एका अपार्टमेंटजवळ थांबला. तेथे राहत असलेल्या एका महिलेजवळ मुका असल्याचे सांगत 10 रूपये मागत होता. दरम्यान जयेशने त्याचे मित्र गोपाल पाटील आणि कोमल पाटील यांना बोलावून घेतले होते. त्यानंतर संशयित बाजूला उभे असलेले या तिघांजवळ येवून मुकाबधिर असल्याने इशाराद्वारे जेवणासाठी पैसे मागत होता. तुला जेवू घालतो असे सांगून त्याला दुचाकीच्या मधोमध बसवून थेट दुचाकी रामानंद पोलीस स्थानकात नेली व त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले.

मोबाईल चोरीची अशी आहे घटना
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान डोंगर पाटील रा. अजंता सिम ता.चोपडा आणि किरण निंबा पाटील रा. मोहिदा ता. चोपडा हे जयेश पाटील, कोमल पाटील आणि महेश पाटील असे एकूण पाच जण मिळून शिवकॉलनी परीसरातील विजय टॉवरजवळी एका अपार्टमेंटमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाड्याने राहत आहे. शनिवारी 24 मे रोजी रात्री उशिरापर्यंत सर्वजण गप्पा मारत रात्री 11 वाजेच्या सुमारास झापले होते. रविवारी 25 मे रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास चोरटा पुन्हा 6.47 वाजता पुन्हा खोलीत शिरला, त्यावेळी सर्वजण गाढ झोपेत असल्याचे पाहून समाधान पाटील आणि किरण पाटील यांनी चार्जींगला लावलेले 11 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले.

चोरटा सीसीटिव्हीमध्ये झाला होता कैद
सकाळी दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना सीसीटिव्हीत कैद झाले असून लवकरच चोरटा रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान यापुर्वी किमान वर्षभरापूर्वी यांच्याच खोलीतून निलेश पाटील, जयेश पाटील आणि पुर्वी राहत असलेला मित्र सागर या तिघांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविले होते. त्यावेळी सुध्दा रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे पाहून अपार्टमेंट मालकांना अपार्टमेंटच्या आवारात चार सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

Add Comment

Protected Content