जळगाव प्रतिनिधी । खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मेहरूणमध्ये बंदूक लाऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, रमेश सोनवणे खून खटल्यातील साक्षीदार अनिल मोतीराम सोनवणे (रा. रामेश्वर कॉलनी ) यांनी औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार ते मेहरूणमधील बुरूजाजवळून जात असतांना रात्री साडेआठच्या सुमारास भूषण वासुदेव सोनवणे (रा. रामेश्वर कॉलनी) याने त्यांची दुचाकी अडवून पिस्तुल रोखत, गुन्हा मागे घे नाही तर जीवे ठार मारीन. अशी धमकी दिली. या अनुषंगाने औद्योगिक पोलीस स्थानकात अनिल सोनवणेंच्या फिर्यादीवरून भूषणविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा खोटा गुन्हा असल्याचा दावा भूषण सोनवणे यांनी केला आहे.