जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीर व विनापरवाना गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस घेवून फायरिंगसाठी जात असलेल्या चौघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील रिव्हॉलवर व जिवंत हस्तगत केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरसोली गावाच्या बाहेर आकाशवाणी केंद्राजवळ संशयित आरोपी नरेश रविंद्र मराठे (वय-२१) रा. शिरासोली, आकाश अरूण जोशी (वय-२४) रा. सिंधी कॉलनी, रविंद्र सिताराम अस्वार (वय-२०) रा. शिरसोली आणि सागर सुधाकर पवार (वय-२३) रा. चिंचपूरा शिरसोली हे चारही मित्र असून यातील नरेश मराठे यांच्याकडे रिव्हॉलवर आणि तीन काडतूस असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. यानुसार शिरसोली येथील आकाशवाणी टॉवर जवळ चौघांना सकाळी १० वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील रिव्हॉलवर आणि तीन जिवंत काडतूसे हस्तगत केले. चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.