नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी आयपीएल २०२४ आधी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठी घोषणा केली आहे. त्याने राजकारणातून निवृत्ती घेत असल्याच जाहीर केला आहे. त्याने स्वत:च लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर गौतम गंभीर तिकीटाच्या शर्यतीतून बाहेर गेलाय. या संदर्भात त्याने टि्वट करुन माहिती दिलीय. आगामी आयपीएल २०२४ सीजनआधी गौतम गंभीरने भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना राजकीत कर्तव्यातून मुक्त करण्याच अपील केली आहे. गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्स टीममध्ये मेंटॉर म्हणून आपला कार्यकाळ सुरु करत आहे.
“मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, अशी मी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्ड यांच्याकडे विनंती केली आहे. क्रिकेटसाठी मी जी कमिटमेंट केलीय त्याकडे मला लक्ष देता येईल. मला लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली, त्या बद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो” असे गौतम गंभीरने टि्वटमध्ये म्हटलं आहे.