जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंजारा प्रीमियर लीगतर्फ़े बंजारा समाज एकत्र यावा या उद्देशाने समाजातील युवकांसाठी युवकांनी ३ दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असून या वर्षी ८ संघ आपल्या संघ मालकांसह सहभागी झाले होते.
यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडू युवकांनी सहभाग घेतला होता. तीन दिवस दिवस रात्री सर्व साखळी पद्धतीचे सामने झाले. अंतिम सामना हा ‘लाखा गोर सनरायझर्स’ विरुद्ध ‘भीमानायक सुपर स्टार’ दोन्ही संघामध्ये झाला यात विजयी होऊन प्रथम पारितोषिक लाखा गोर संघांने मिळवले तर द्वितीय पारितोषिक भीमानायक सुपर स्टार या संघाने मिळवले. जिल्ह्यात प्रथमच समाजाला एकत्र आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रिकेट स्पर्धेत बक्षीस वितरण करण्यासाठी मुख्य प्रायोजक गजानन इस्टेट ब्रोकर, रमेश जगराम चव्हाण सह, प्रायोजक कैवासी रेखाजी बहुउद्देशीय संस्था, पारितोषिक मुख्य प्रायोजक रवींद्र राजाराम पवार. स्वामी शिक्षण संस्था रावेर यांची उपस्थिती होती.
संघमालक शैलेश पवार, डॉ.कृष्णा राठोड, डॉ.विजय नाईक, डॉ. प्रवीण राठोड, डॉ.श्रद्धा राठोड, डॉ.स्वाती नाईक, डॉ.तुषार राठोड, मदन चव्हाण, जाधव भाऊल चव्हाण, निलेश चव्हाण, भारमल नाईक, धाडी सर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत आयोजन करण्यासाठी काशिनाथ चव्हाण, सुनील नाईक, नितीन जाधव, बादल नाईक, पपेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.