जिल्ह्यातील चार ज्येष्ठ खेळाडूंना क्रिकेट जीवन गौरव पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाराव्या मास्टर्स क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील चौघा खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजक जळगांव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार क्रिकेट साठी योगदान देणाऱ्या जेष्ठ खेळाडूंना देण्यात येत असतो.

ह्या वर्षी अमळनेर येथील निवृत्त प्राचार्य व प्रताप तत्वज्ञान केंद्राचे संचालक माजी खेळाडू प्रा. डॉ. दिलीप सुकलाल भावसार, धुळे व जळगांव जिल्ह्याचे खेळाडू, राहुरी कृषी विद्यापीठ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार,विद्यार्थी सहाय्यक समितीचे संचालक ऍड.सलीम खुदादाद खान, अमळनेर येथील एस. टी. महामंडळाचे राष्ट्रीय खेळाडू माजी जिल्हा कर्णधार संजय केदारराव पवार, भुसावळ डी. आर. एम. कार्यालयातील मुख्य कार्यालय अधीक्षक जळगांव व अकोला जिल्हा तसेच रेल्वे डिव्हिजनल खेळाडू मनोज रामस्वामी पुन्नल यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्य एस. एस. राणे, सावद्याचे माजी उपनगराध्यक्ष व माजी क्रिकेट खेळाडू फिरोज पठाण, चंद्रशेखर देशमुख,जळगांव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी, सचिव ऍड. केतन ढाके, कोषाध्यक्ष बाबा शिर्के, adv नितीन देवराज,राष्ट्रीय कबड्डीपटू बन्सी माळी, माजी सिनेट सदस्य शब्बीर सय्यद, अन्न व औषध प्रशासन अधिकारी मिलिंद साळी, वजन माप निरीक्षक अनंत पाटील यांच्यासह जिल्ह्याभरातील क्रिकेट खेळाडू उपस्थित होते. सन्मान पत्र वाचन भुसावळ रेल्वेचे उमाकांत बाउस्कर यांनी केले. सूत्रसंचालन युवराज वाघ यांनी केले.

Protected Content