जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे त्यांचे माजी सचिव स्वर्गीय सुरेश अग्रवाल यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय मर्यादित ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते या वर्षीची ही २० स्पर्धा आहे. यास्पर्धेचे आयोजन जैन इरिगेशन कंपनीच्या सहकार्याने अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर करण्यात येत आहे. आज या स्पर्धेचे उदघाटन जैन इररिगेशन सिस्टीम लिमिटेड चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश(बापू) खैरनार, सचिव अरविंद देशपांडे , संयुक्त सचिव अविनाश लाठी स्पर्धेचे पंच संतोष बडगुजर, प्रकाश जाधव, व सहभागी संघातील खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते. उदघाटन पर मनोगतात अशोक जैन यांनी स्वर्गीय सुरेश अग्रवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. सचिव अरविंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, संयुक्त सचिव अविनाश लाठी यांनी आभार मानले.यानंतर जैन इरिगेशन ‘ब’ संघ व रायसोनी आचिव्हर्स यांच्यातिल प्रथम सामन्याची नाणेफेक अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आली. हा सामना जैन इरिगेशन संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला. यात ओम मुंढे याने नाबाद ३६(७०), व कुणाल फालक याने नाबाद २४(२९) यांनी फलंदाजीत महत्वपुर्ण योगदान देऊन सामना जिंकला. रायसोनी संघातर्फे दिलीप विश्वकर्मा, सुशांत जाधव व सचिन चौधरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामनावीर ओम मुंढे ज्याने फलंदाजीत नाबाद ३६ धावा केल्या व गोलंदाजी करतांना रायसोनी संघाचे ३ महत्वपूर्ण बळी मिळविले. या सामन्यात संतोष बडगुजर व प्रकाश जाधव यांनी पंच म्हणून तर गुणलेखक मोहंमद फझल यांनी काम केले